‘मंगलमूर्ती’ने आईवडलांना पुन्हा दिला ‘हर्ष’

अपघातग्रस्त हर्ष ठाकरेला मंगलमूर्ती गृपची मदत

0

बहुगुणी डेस्क, वणीः हर्ष नावाच्या बालकाला उपचारासाठी मदत करून मंगलमूर्ती गृपने माणुसकीच्या अाशा पुन्हा पल्लवित केल्यात. कायर रोड तसा कमी-जास्त वर्दळीचाच. खराब रस्ते आणि बेशीस्त वाहतुकीचा धोका नेहमीचाच. हाच रस्ता पार करण्याच्या प्रयत्नात सेवानगर येथील 12 वर्षीय हर्ष अशोक ठाकरे होता. सोबतीला त्याचा मित्रही होता. रस्ता क्रॉस करणार तोच एका बाईकस्वाराने हर्षला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, हर्षच्या मांडीचे हाड तुटले.

आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हर्षच्या परिवारावर हे एक नवं संकट होतं. आई-वडील मोलमजुरी करून पोट भरायचे. कोवळ्या पोराचं भविष्य पुढ्यात होतं. सोबतीलाच होती दारिद्रयाची पीडा. क्षणात हर्षच्या आईला ‘मंगलमूर्ती’ची आठवण झाली. तिच्या जिवात जीव आला. अत्यंत आषेने तिने ‘मंगलमूर्ती’ गृपला मदतीचा हात मागितला.

‘मंगलमूर्ती’ गृपचे संस्थापक सोमू निमकर यांनी या विषयावर आपल्या टीमसोबत सल्लामसलत केली. या लेकराला उपचारासाठी कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याचे ठरले. टीमच्या सर्व सदस्यांनी हर्षच्या मदतीसाठी पैसा उभा केला. हर्षवर तातडीने उपचार सुरू झालेत. पंकज गुप्ता, जितू पाटील, अजय पोहाणे, विहंग उपरे, अजय कोडगिरवार, संतोष कोंडमवर, पवन निकुरे, अजय पुरमशेट्टीवार यांनी पुरेपूर सहकार्य केले. मंगलमूर्ती ग्रुप ने हर्ष ला इलाजासाठी आर्थिक मदत केली. यासाठी हर्ष च्या आई वडिलांनी मंगलमूर्ती ग्रुप चे आभार मानले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.