मांगली येथील दारूबंदीची निवडणूक म्हणजे महिलांचे शोषण
निवडणुकीच्या नावाने लाखो रुपये उकळल्याची चर्चा
सुशील ओझा, झरी: माांगली येथे दारूबंदीसाठी 24 मार्चला मतदान झाले. मात्र 50 टक्यांपेक्षा कमी मतदान झाल्याने उभी बाटलीचा विजय निश्चित झाला. मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकारण करून, महिलांशी दगाफटका करून त्यांच्या भावनांशी खेळ खेळण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. तर काही लोक ‘मॅनेज’ होऊन बाहेरून दारूबंदीसाठी व आतून उभ्या बाटलीसाठी मदत करत असल्याचे समोर येत आहे.
तालुक्यातील मांगली येथील परवाना धारक देशी दारू दुकान बंद करण्याकरिता सर्व गाव एक झाले होते. त्याकरीता ग्रामसभा, विशेष ग्रामसभा घेऊन वरिष्ठ अधिकारी पर्यंत निवेदन देऊन दारूबंदीची मागणी केली. मात्र दोन महीने लोटूनही कोणतेही पाउल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उचलन्यात न आल्याने गावातील महिला व प्रतिष्ठित लोकांनी जिल्हाधीकारी कार्यालयावर धड़क देऊन सरपंच व महिलानी मिळून निवेदन दिले व मांगली गावात दारुबंदी ची निवडणूक त्वरित घ्यावी अशी मागणी केली. या अनुषंगने मांगली गावातील महिलांच्या सह्य तपासणी झाल्या, मतदार यादी ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली व दारूबंद करीता निवडणुकीची तारीख २४ मार्च घेण्यात आली.
मतदानाची तारीख निश्चित होताच १० दिवसांपूर्वी पासून गावातील प्रत्येक प्रतिष्ठित नागरिकांसर महिलांनी कंबर कसली. गावात बैठका, रॅली, लाउडस्पीकर लाउन प्रचार करणे सुरु झाले. स्वामिनीचे जिल्हा संघटक व तालुका संघटक राम आईटवार यांनी मांगली गावात येऊन प्रत्येक घरात जाउन मतदान करण्याकरिता महिलांना प्रव्रुत्त केले. गावातून नारे देत रॅली काढली परंतु यात यश आले नाही.
मतदनाच्या दोन दिवसांपूर्वीच अशी चर्चा अशी होती की मांगली येथील देशी दारूचे दुकान १००% बंद होणार होते मात्र आता बंद होणार नाही. दारू दुकानदार यवतमाळ येथील गुंड बोलावून गावातील प्रतिष्ठित लोकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती ठाणेदार वाघ यांना देण्यात आली. तर गावातील महिलांना पैशाचे वाटप, पुढाकार घेणाऱ्या कही महिलांना, देवदर्शनाला पाठवींने असे प्रकार दारू दुकान दाराकडुन करण्यात आल्याचा आरोप झाला.
२४ मार्च मतदानाच्या दिवशी दारूबंदीसाठी पुढाकार घेणारे लोकच महिलांना मतदाना करीता घराबाहेर काढण्यात अपयशी ठरले. तर काही पुढारी तर एका जागेवर बसले व संध्याकाळ पर्यन्त उठायला तयार नव्हते. ज्यामुळे गावातील लोकात वेगवेगली चर्चा चौकात, पानटपरी वर सुरु होती. हे सर्व नाटक पैशासाठी केल्याचा आरोप गावातून होत होते.
मतदनाच्या दिवशी स्वामिनीचे तालुका संयोजक राम आईटवार मांगली गावतील महिलांना हातपाय जोड़त मतदानाकरीता नेत होते परंतु पुढाकार घेणारे एकाच ठिकाणी बसून होते हे विशेष. तर गावतील एक प्रमुख व्यक्ती उभ्या बाटलीवर मतदान करण्यास सांगत उभी बाटली जिंकण्याकरिता दिवसभर धावपळ करीत होता. ज्यामुळे लोकात वेगळीच चर्चा होती.
परवाना धारक देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी जे एकत्र आले व त्यांच्यातच दोन गट झाले. या दोन्ही गटचे कोणतेही नुकसान न होता दुकानदाराकदुन दोघनींही लाखो रुपये उकळल्याची चर्चा सम्पूर्ण तालुक्यात होत आहे. ज्यामुळे दोन्ही गटाकडुन दारू दुकानदाराला मोठी टोपी टाकण्यात आल्याचे दिसते. असाच प्रकार करून पैसे घ्यायचे होते तर मतदानाचे नाटक करून महिलांच्या भावनांशी खेळून राजकारण करण्याचे काय कारण होते असा प्रश्न सुज्ञ लोकांकडून विचारला जात आहे.
दारू दुकान बंद करण्याकरिता झालेल्या मतदानात महिलांच्या एकूण ७१० मतदार पैकी २८३ महिलांनी मतदान कले त्यात. आड़वी बाटली करिता २२० उभी बाटली ४७ व अवैद्य मत १६ पडली जिथे उभ्या बटलीला एकही मत पाडायल नको होते तिथे ४७ मत पडल्याने जनतेच्या शंकेत पुन्हा भर पड़ली.