मांगली येथील देशी दारूच्या दुकानात चोरी

अज्ञात चोरट्याने उडवले दीड लाख रुपये

0 636

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील परवाना धारक देशी दारू दुकानातून रोख रक्कम उडविल्याची घटना घडली असून याबाबत मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. मांगली येथे जयस्वाल बंधूंची देशी दारूचे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ५ मे रोजी रात्री दारूचे दुकान नेहमी प्रमाणे बंद करून विक्रीचे हिशोब करून विक्रीचे पैसे दुकानातीलच पेटीमध्ये ठेऊन झोपले. दुसऱ्या दिवशी ६ मेला सकाळी दुकान उघडायल गेले दरवाज्याचे कुलूप फोडून दरवाजा अधर लागलेला आढळला.

त्यांनी दुकान उघडून बघितले असता दुकानातील पैशाची पेटी गायब झाल्याचे दिसले. शोधाशोध केली असता पैशाची पेटी वॉलकंपाउंडच्या गल्ली मध्ये आढळली. परंतु त्या पेटीचेही कुलूप तोडून त्यातील रक्कम गायब झाल्याचे दिसले. यावरून दुकानाचे मालक रिता सतीश जयस्वाल मुकुटबन पोलीस स्टेशन गाठून देशी दारूचे दुकान फोडून १ लाख ६० हजार नगदी रोख अज्ञात व्यक्तीने चोरी करून नेल्याची तक्रार नोंदविली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अज्ञात चोरविरुद्ध कलम ४६१,३८० ,३४, भादवि कलमांतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस.आय शशिकांत नागरगोजे, प्रवीण ताडकोकुलवार व नीरज पातूरकर करीत आहे.

Comments
Loading...