शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक ‘टाईट’

शाळेत शिक्षक दारू पिऊन झोपून आढळल्याने एकच खळबळ

0
सुशील ओझा, झरी: जिल्हा परिषद शाळा ही गोरगरीब, कष्टकरी लोकांच्या मुलांची शाळा ओळखली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी बहुतांश शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांच्या तोडीस कुठेही कमी राहू नये यासाठी शाळेत संगणक बसवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेबाबत आपुलकी, प्रेम निर्माण व्हावे यासाठी शासनाने शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे, त्यांना पाठ्यपुस्तके वाटावे इत्यादी आदेश दिले आहेत. मात्र झारी तालुक्यातील मांगुर्ला जिल्हा परिषद शाळेत मात्र वेगळाच प्रकर उघडकीस आले. या शाळेतील मुख्याध्यापक चक्क दारू पिऊन खुर्चीवर झोपून असल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून सध्या याची खमंग चर्चा परिसरात सुरू आहे.
26 जुलै रोजी शाळेचा पहिला दिवस होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी मांगुर्ला येथील शिक्षक नंदकिशोर उईके रा. पवनार हे दारू पिऊन शाळेत असल्याचे गावातील नागरिकांना निदर्शनास आले. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी पंचायत समितीला तक्रार केली. यावरून पंचायत समिती सभापती लता आत्राम, पं.स सदस्य राजेश्वर गोंडरावार, गटशिक्षणाधिकारी हे लगेच पंचायत समितीची गाडी घेऊन मागुर्ला शाळेला भेट दिली. तेव्हा सदर शिक्षक खुर्चीवर झोपलेले आढळले.
या घटनेचा लगेच पंचनामा करण्यात आहे. गावक-यांनी दारूड्या शिक्षकाची बदली करावी तसेच शाळेतील शिक्षकाचे रिक्त पद भरावे अशी मागणी केली. या प्रकरणी व्हिडीओ रेकॉर्डिंग जरी झाले असले तरी टुन्न असलेल्या शिक्षकाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी शिक्षकाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप गावक-यांनी केला आहे.
या बाबत २६ जुलैच्या मासिक सभेत गोंदरावार यांनी पंचायत समिती सभेत हा मुद्दा उचलला व बीईओंना शाळेला भेट देण्याबाबत विचारणा केली असता. त्यांनी अद्याप एकही शाळेला भेट दिली नसल्याचे सांगितले. तर गटविकास अधिकारी यांना घेऊन झरीतच मुलांची प्रभात फेरी काढल्याचे सांगितले. यावरून शिक्षकच नाही तर प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळेप्रती किती तत्पर आहेत हे दिसून येत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.