सुरेंद्र इखारे, वणी: भारतीय जनता पार्टिच्या जाहिरनाम्या नुसार मुख्यमंत्रयांनी मराठा व धनगर समाजाला तात्काळ आरक्षण घोषित करून आश्वासन पाळावीत आणि त्यांच्या आंदोलनाला विराम देण्याच्या मागणीचे निवेदन श्री गुरुदेव सेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांचे मार्फत देण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाला घेऊन मराठा समाज उग्र आंदोलन करीत आहे यात काही मराठा बांधवांनी आपला जीव ही गमावला आहे. मागील वर्षी ऐतिहासिक विश्व विक्रमी मराठा मूकमोर्चे अत्यंत शांततेत पार पडले. परंतु या मोर्चानकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने आणि सरकारनी दिलेली आश्वासने न पाळल्याने मराठा समाज आक्रमक होऊन आंदोलन करीत आहे.
त्यांच्या भावनेचा विचार करून सरकारनी तात्काळ आरक्षण घोषित करावं त्याच बरोबर धनगर आरक्षणही सरकाराने प्रलंबित ठेवले आहे. तो ही समाज रस्त्यावर उतरे पर्यंत सरकारनी प्रतीक्षा करू नये. दोन्ही समाजाला अश्वासना प्रमाणे आरक्षण घोषित करावे अशी मागणी श्री गुरुदेव सेनेने केली आहे.
यावेळी सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, मुख्य संघटक मिलिंद पाटील, गजानन शिंदे, पुंडलिक मोहितकर, शंकर निखाडे, जीवन निखाडे, रोषन डोंगरे, निखिल झाडे, राहुल ताटे आदी उपस्थित होते.