शहर प्रतिनिधी, मारेगाव: शहरातून चौपदरी हायवे गेल्यामुळे मारेगाव शहरासाठी दोन बस स्टॉप मंजूर झाले. सध्या परिस्थितीत एक बस स्टॉप तयार आहे, पण त्या बसस्टॉप जवळ बस कधीच थांबत नाही, त्याऐवजी बस जुन्याच थांब्याजवळ उभी राहत आहे. पण जुन्या बस थांब्याजवळ अतिक्रमण असल्यानं प्रवाशांना जीव मुठीत धरून गाडीची वाट पाहावी लागतये. तर मध्यवर्ती बँकेजवळ असलेल्या नवीन बस स्टॉपजवळ गाडी थांबत नसल्यानं हा स्टॉप सध्या परिसरातल्या लोकांना गप्पा मारण्यासाठी कामी येत आहे.
मारेगावमध्ये नवीन बस स्टॉप झाल्याने त्या ठिकाणी बस थांबणे गरजेचं आहे, पण बस अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या जुन्या बस स्टॉपजवळ थांबत आहे. तिथं येणाऱ्या भरधाव वाहनामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. तर जुन्या बसस्टॉपासून तीनशे मीटरवर तयार करण्यात आलेलं नवीन बसस्टॉपचं शेड हे केवळ शोभेची वस्तू बनली आहे.
याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बसस्टॉपची ही समस्या लवकरात लवकर सोडवून प्रवाशांसाठी बसस्टॉपजवळ मुत्रीघराची सोय करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे..
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post
Next Post