मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
कोणती ग्रामपंचायत कोणत्या वर्गासाठी राखीव?
नागेश रायपुरे, मारेगाव: सन 2020 ते 25 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी तालुक्यातील 56 ग्रामपंचायत पैकी 31 ग्रामपंचातीच्या सरपंचपदाचे आरक्षण आज मंगळवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मारेगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात जाहीर करण्यात आले. 31 ग्रामपंचायतीपैकी 2 ग्रामपंचायत अनुसुचित जातीसाठी, 5 अनुसुचित जमातीसाठी, तर इतर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 9 ग्रामपंचायती सुटल्या आहेत. 15 ग्रामपंचयाती या सर्वसाधारण गटासाठी सुटल्या आहेत. यातील महिला राखीव गटाचे आरक्षण यवतमाळ येथे गुरुवारी 4 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. तर 24 जागा या पेसा अंतर्गत अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार दीपक पुढें, नायब तहसीलदार दासरवार यांच्या उपस्थितीत हा आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
अनुसुचित जातीसाठी कोलगाव आणि ताकडखेडा या दोन ग्रामपंचायत सुटल्या आहेत. अनुसुचित जमाती साठी नवरगाव, देवाळा, चिंचमंडळ, कोथुर्ला, दांडगाव या पाच ग्रापंचायती राखीव झाल्या आहेत. नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी+इतर जाती) यात गाडेगाव, चोपन, सावंगी, आकापूर, इंदिरा ग्राम, कोसारा, शिवणी (धोबे), हिवरी, गौराळा या 9 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सर्वसाधारण वर्गासाठी केगाव, खैरगाव (बु), मजरा, किन्हाळा, सिंधी महागाव, बोरी(बु), आपटी, हिवरा (मजरा), करणवाडी, मांगरुळ,टाकळी, कुंभा, वेगाव, मार्डी, वनोजा (देवी) या ग्रामपंचायती खुल्या आहेत. यात नियमाप्रमाणे महिलांच्या आरक्षणाचा देखील समावेश आहे. या 15 ग्रामपंचायतीचे महिला राखीव आरक्षण व पेसा अंतर्गत महिला आरक्षण हे 4 फेब्रुवारीला काढण्यात येणार आहे.
यावेळी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार दीपक पुढें नायब तहसीलदार दासरवार यांच्या उपस्थितीत हा आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
हे देखील वाचा: