मारेगाव: बारावीच्या परीक्षेत तालुक्यातुन अव्वल स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मराठा सेवा संघ तालुका शाखा मारेगाव व ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने करण्यात आला. सोमवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांनी परिश्रम करुन मिळविलेल्या यशाने त्यांचे उज्वल भविष्य घडावे यासाठी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कला वाणिज्य महाविद्यालयातील बारावीत तालुक्यातुन मुली मधून प्रथम आलेली अलिजा सैलानी खान हिला ८२.१७% गुण मिळाले असुन, विद्यानिकेत कॉलेजची सायंसची विद्यार्थीनी साक्षी मोहन खाडे हि तालुक्यातुन दुसरी तर साक्षी किशोर जुनेजा हिने तालुक्यातुन तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अनामिक बोढे, ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष डॉ. माणिक ठिकरे, पत्रकार संघाचे सचिव माणिक कांबळे, मसेसचे सचिव व ग्रामीण पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष ज्योतिबा पोटे, पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष नागेश रायपुरे, पत्रकार संघाचे सल्लागार देवेंद्र पोल्हे, सदस्य अशोक कोरडे, उमर शरिफ, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष कुंदन पारखी, राहुल घागी, प्रदीप बोरकुटे इत्यादी उपस्थित होते.