मारेगाव तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्षपदी प्रमोद लडके

0

बहुगुणी डेस्क, मारेगाव :मारेगाव तालुका संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्षपदी प्रमोद लडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पक्ष बांधणी आणि तालुका कार्यकारीणीच्या बैठकीत हे जाहिर करण्यात आले. येथील ग्रीनपार्क या ठिकाणी संभाजी ब्रिगेड तर्फे कोजागिरी चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

Podar School 2025

या बैठकीचे अध्यक्ष अजय धोबे, जिल्हा अध्यक्ष यवतमाळ (पूर्व) यांनी भूषविले. या बैठकीत विधानसभा व लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून,जाणून घेऊन कार्य करण्याचे कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात आले. त्याच सोबत आपल्या नवीन पक्षाची ताकद कशी वाढवता येईल या बद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...


या बैठकीत काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पदोन्नती देण्यात आली.
नवीन कार्यकारणी मारेगाव
कुंदन पारखी,जिल्हा संघटक,यवतमाळ (पूर्व)
प्रमोद लडके,अध्यक्ष संभाजी ब्रिगेड,मारेगाव तालुका.
नीलेश गौरकार,उपाध्यक्ष,मारेगाव तालुका.
मारोती जूनघरी,कार्याध्यक्ष,मारेगाव तालुका.
या बैठकीला विशेष मार्गदर्शक म्हणून विधानसभा नेते अनंत मांडवकर, वणी मतदारसंघ उपस्थित होते. तसेच विशेष उपस्थिती म्हणून प्रबोधनकार व कीर्तनकार विकास चिडे होते.प्रकाश कोल्हे, कार्याध्यक्ष,यवतमाळ.अनामिक बोढे,म.से.स. अध्यक्ष,मारेगाव.,ज्योतिबा पोटे,तालुका सचिव,मारेगाव. विवेक ठाकरे,अध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,वणी तालुका. शंकर निब्रड,जिल्हा सचिव,यवतमाळ(पूर्व) तसेच अजय कळसकर,मोरेश्वर बनसोडे,राहुल घागी,अमोल कळसकर व इतर मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड आणि वीर भगतसिंग विद्यार्थी पतिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.