मारेगाव पोलिसांची इंदिराग्राम परिसरातील कोंबडबाजारावर धाड

46560 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 6 जणांवर कारवाई

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील इंदिराग्राम परिसरात कोंबड बाजारात कोंबड्यांची झुंज लावून सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. शुक्रवारी दिनांक 31 डिसेंबरच्या दुपारी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी 46560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरात असणाऱ्या इंदिराग्राम तसेच नगारा पोड या परिसरात काही इसम कोंबड्यांची झुंज लाऊन त्यावर पैसे लावत असल्याची विश्वसनीय माहिती मारेगाव पोलिसांना मिळाली. या माहितीवरून मारेगाव पोलीसानी सापळा रचत सहा. पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभा परिसरातील नगारा पोड व इंदिराग्राम परिसरातील भागात गस्त सुरू केली.

दुपारी 2 वाजताच्या दरम्यान कुंभा ते बोटोनी रोडवर रस्त्याच्या एका शेता लगत खुल्या जागेवर काही लोकांचा आवाज आल्याने पोलिसांनी त्या दिशेने कूच केली. तिथे कोंबडबाजार सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली. धाड पडताच तिथे एकच पळापळ सुरू झाली. लोक मिळेल त्या मार्गाने पळत होते. काही लोक शेतातील रस्त्यातून पळण्यात यशस्वी झाले, मात्र 6 जण पोलिसांच्या तावडीत सापडले.

घनश्याम वसंता सातघरे- वय 23, कुणाल निलकंठराव हजारे- वय 22, हर्षद अरुनराव बावणे- वय 22, तिघेही रा. पोहना, ता. हिंगणघाट, जी. वर्धा, मोहन बापूराव मजगवळी- वय 40, स्वप्नील चंद्रभान जुमणके- वय 31 दोघेही रा. मांगरुळ, ता. मारेगाव, जि. यवतमाळ व भीमराव तुकाराम मडावी , वय 25 रा. बाभई पोड, ता. मारेगाव यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली. या कार्यवाहीत एकूण 46560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये नगदी 2310 रुपये, 3 कोंबडे किंमत अंदाजे 1050, जिओ कंपनीचे दोन मोबाईल, किंमत 1200, दोन मोटर सायकल, किंमत 42 हजार, MH 29- AJ 6858, MH 29- H 859 असा एकूण 46560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलिसांनी केली.

हे देखील वाचा:

नववर्षाची पार्टी करून गावी परतणा-या तरुणाच्या दुचाकीला अपघात

Comments are closed.