नागेश रायपुरे, मारेगाव: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मारेगाव येथे शिवसेनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. पंचायत समिती उपसभापति तथा तालुका प्रमुख संजय आवारी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.
यामध्ये मारेगाव तालुका गंभीर स्वरूपाचा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार मदत जाहीर करा, रोजगार हमीचे कामे तात्काळ सुरु करा, शासनाच्या हमी भावाने कापूस खरेदी सुरु करा किंवा अवैध खरेदीदारांवर कायदेशीर करवाई करा, सि.सि.आय.ची कापूस खरेदी सुरु करण्यात यावी, पीक कर्ज वसूलीला स्थगिती देण्यात यावी, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, इत्यादी मागण्यांचा समावेश या निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदन देते वेळी संजय आवारी, अभय चौधरी, सुनील गेडाम, गोविंदा निखाड़े, राजू मोरे, संजय लांबट, दुमदेव बेलेकर, दिवाकर सातपुते, जीवन काळे, राजू उराडे, किसन मत्ते इत्यादी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.