मारेगाव: आदिवासी बहुल असलेल्या मारेगाव तालुक्यातील जवळपास पाच गावांमध्ये परप्रांतीय डॉक्टरांनी बनावट पदव्या घेवून, वैद्यकीय व्यवसायाचे दुकाने थाटले आहे. या बोगस डॉक्टरांकडून वैद्यकिय सेवेच्या नावावर रुग्णाकडून हजारो रुपयांची लूट करीत आहे. मात्र या बोगस डॉक्टरांवर कार्यवाही होत नसल्याने यावर आरोग्य प्रशासन मेहरबान झाले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्यातील नवरगाव, चिचमंडळ, हिवरा, मार्डी, कुंभा, मारेगाव आदी गावात अनेक वर्षांपासून परप्रांतातील बोगस डॉक्टरांनी दुकान थाटले आहे. वैदकीयसेवच्या नावाखाली अनेक छोटे मोठे ऑपरेशन करुन रुग्नांच्या जीवनाशी खेळ करीत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राची आरोग्य सेवा कोलमडल्याने रुग्णांना नाईलाजास्तव तालुक्यातील नवरगाव, चिंचमंडळ, मार्डी, कुंभा, हिवरा-मजरा आदी ठिकाणी गेल्या अनेक वर्षा पासून वैद्यकिय व्यवसायाचा डेरा टाकून बसलेल्या बोगस डॉक्टरांकडून उपचार करण्याशिवाय पर्याय नाही. याचा फायदा घेत या बोगस डॉक्टरांकडून इलाजाच्या नावावर भोळ्या रुग्णाला कंपनीच्या प्राचारार्थ मोफत दिल्या जाणारे औषध, गोळ्या, इंजेक्शन रुग्णाना देवून यांच्या कडून फसवणूक केली जात असल्याची ओरड सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
हाइड्रोसील, भगंदरचे ऑपरेशन विना तपासणी करत असल्याने रुग्नांच्या जीवितासी खेळ सुरू आहे. हा बोगस डॉक्टरांनी आदिवासी बहुल परिसरातील रुग्नांच्या जोरावर रग्गड माया जमविली असल्याचे बोलले जात आहे. अवघ्या तालुक्यातील ग्रामीण भागात सक्रिय झालेल्या बोगस डॉक्टरांची चौकशी होऊन यांचेवर कारवाई व्हावी या मागणीने आता जोर धरला आहे.