करवसुलीसाठी मारेगाववासियांना चक्क कोर्टाची नोटीस

मोठ्या करदात्यांमध्ये उडाली एकच खळबळ

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतची लाखो रुपयांची कर वसुली थकीत असून चालू आर्थिक वर्षांत कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता कोर्टाची मदत घेतली आहे. वरिष्ठांचे आदेश धडकताच करदात्यांना कोर्टाची नोटीस देऊन लाखोंचा गृहकर, व्यवसायकर व इतर करांची वसुली करण्याचा उपाय आता करण्यात येतोय. कर वसुलीसाठी चक्क कोर्टाची नोटीस आल्याने थकबाकिदारांत खळबळ उडाली आहे. नोटिसीचा धसका घेऊन थकीत कराचा भरणा करण्यासाठी सध्या धावपळ सुरु आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पहिले ग्रा.पं.प्रशासन असताना व आता नगरपंचायत अस्तित्वात आल्याॉनंतर अनेकांकडे कराची थकबाकी होती. ती थकबाकी करताना प्रशासनला नाकीनऊ येत असल्याचा अनुभव नगरपंचायत प्रशासनाला आला. त्यामुळे संबंधित विभागाने वारंवार नगरपंचायतला करवसुली करण्याच्या सूचना दिल्या ,पण कर वसुली योग्य प्रमाणात होत नसल्याने करदात्यांना चक्क कोर्टाची नोटीस बजावून उडवून दिली आहे. येत्या ९ डिसेंबरच्या आत सर्वांनी कराचा भरणा करावा, त्या नंतर कोणालाही कोर्टात हजर होण्याची गरज नाही असे नगरपंचायतचे मुख्याधिकारी पृथ्विराज पाटील यांचे म्हणणे आहे.

अनेकाच्या मते नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर दोन ते अडिच वर्ष लोटली. पन मारेगाव शहराचा विकास शुन्य असुन नगर पंचायतला मिळालेला तीन कोटींचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. तो निधी जर शासनाकडून विकास कामासाठी येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग त्या निधीचा वापर करत नसेल तर त्यांच्यावर कोण कारवाई करेल ? असा सवाल मारेगाववासी उपस्थित करीत आहे.

करदात्यांना पाठवण्यात आलेली हीच ती नोटीस

Leave A Reply

Your email address will not be published.