मारेगाव येथे झाली वंचित बहुजन आघाडीची सभा

0

नागेश रायपुरे , मारेगाव :– शहरात वंचित बहुजन आघाडीची सभा झाली. या सभेत सरकारचे ,शेतकरी विरोधात धोरण असल्याने आजपरंत पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असा आरोप करण्यात आला.आता परिवर्तनाचा विकास करायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी सोबत प्रत्येक समाज घटकानी यायला हवे.

निवडून आल्यावर कोणताच शेतकरी आम्ही कोरडवाहु ठेवणार नाही. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार ऑड. राजेंद्र महाडूळे हे मारेगाव येथे प्रचार रॅली दरम्यान शहरातील आंबेडकर चौकात झालेल्या सभेत उपस्थिताना संबोधित करत होते.

प्रस्थापित कॉंग्रेस भाजप सरकार टिका करत ते बोलत होते.ही धन शक्तीच्या विरोधात जन शक्तीची खरी लढाई असून यांनी आजपर्यंत जातिला धरून राजकारण केले परंतु वंचित बहुजन आघाडी जाती जातीला धरून विकासात्मक परिवर्तन करण्यासाठी राजकारणात उतरले आहे .

तुमची वकीली करण्यासाठी संसदेत जाण्यासाठी धन शक्ति च्या विरोधात तुमची जन शक्ति घेवून रिंगणात उतरलो आहो.प्रस्थापित सरकारला धड़ा शिकवून वर्षाला प्रत्येक दहा हजार बेरोजगारना रोजगार देण्याचे,मोफत शिक्षण देण्याचे,शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव देण्याचे काम बहुजन वंचित आघाडी करणार असल्याचे राजेंद्र महाडुळे प्रचार रॅली सभेदरम्यान ते बोलत होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.