बाजार समितीच्या सभापतींचा गेटला हार घालून संताप

मुकुटबन-पाटण रस्त्याबाबत आंदोलनाचा इशारा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन ते पाटण व पाटण ते बोरी 84 कोटींच्या 29 किमी अंतराच्या रोड दुरुस्तीचे काम सुरू आहे. सदर काम करत असलेला कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असून यात लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. याबाबत उपोषणाचा इशारा देताच सर्व खड्डे गिट्टी व डांबर टाकून बुजविण्यात आले.

84 कोटींचे हे काम असून रस्त्याच्या कामात भ्रष्ट्राचार होऊ नये तसेच रस्ता मजबूत व टिकाऊ व्हावे याकरिता 15 मे, 19 मे, 9 जून ला शासकीय बांधकाम विभागाच्या युवक काँगेस तर्फे तक्रार देण्यात आली होती. व इस्टीमेट नुसार रस्त्याचे काम करावे तसेच मुकुटबन ते पाटण रस्त्याची चौकशी करावी व 17 जून ला बाजार समितीचे सभापती संदीप बुरेवार यांनी माहितीच्या अधिकारात रोड कोणत्या पद्धतीने बनवीत आहे याबाबत 11 मुद्द्या बाबत मागितली होती.

परंतु सदर रस्त्याची माहिती देण्यास पांढरकवडा बांधकाम विभाग टाळाटाळ करीत आहे तसेच वेळोवेवेळी फोन करून ऑफिसमध्ये गेले परंतु अधिकारी भेटले नाही, असा आरोप बुरेवार यांनी केला आहे. याबाबत संदीप बुरेवार यांच्या नेतृवात चक्काजाम करण्यात आला. मुकुटबन ते बोरी 29 किमी अंतराच्या रोडची काम सुरू असताना संमधीत अभियंते रोडची काम पाहण्याकरिता ढुंकूनही पाहत नसून बाहेर गावावरून शेळ्या हकण्याचे काम करीत आहे. त्यामुळे रस्त्याचा दर्जा कोण तपासणार असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.

मुजोर बांधकाम विभाग हे कंत्राटदाराच्या दावणीला असल्यामुळे अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही व दर्जेदार रोडची काम सुरू नसल्याचे बुरेवार यांनी आरोप केले आहे. बुरेवार आपक्या कार्यकर्त्यासोबत माहिती व तक्रार देण्याकरिता पांढरकवडा बांधकाम विभागात 30 ऑगस्टला गेले असता संबंधीत अधिकारी यांच्या ऑफीसला कुलूप लावलेले होते. ऑफिसला अनेकदा जाऊनही अधिकारी यांची भेट होत नसल्याने संतापलेले सभापती संदीप बुरेवार यांनी ऑफिसच्या गेटला हार टाकूण आपला संताप व्यक्त केला.

रस्त्याबाबत अनेक तक्रारी करून सुद्धा बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने अखेर 3 सप्टेंबरला पांढरकवडा बांधकाम कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याचे बुरेवार यांनी संगीतले त्यावेळी भगवान चुकलवार, केशव लकशेट्टीवार, रमेश संनसंनवार, शंकर शीडाम उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.