वणीत संचारबंदीत चक्क लग्नाचा धूमधडाका
नियम धाब्यावर बसवून तिरुपती मंगल कार्यालयात लग्न सुरू
जब्बार चीनी, वणी: संचारबंदी असतानाही वणीतील नांदेपेरा रोडवरील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात लग्न सुरू आहे. सकाळी 10 वाजेपासूनच व-हाड्यांनी मंगल कार्यालयात लग्नासाठी गर्दी केली आहे. याशिवाय छोरीया ले आऊट इथेही लग्न कार्य सुरू असल्याची माहिती आहे. संचारबंदीत लग्नाला कोणताही परवानगी नसताना शहरात सुरू असलेल्या लग्न कार्याबाबत प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ आहे.
कोरोनाचा वाढता प्रकोप बघून जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपासून ते सोमवारी सकाळी पर्यंत लॉकडाऊनसह संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच घराबाहेर निघण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठान, मंगल कार्यालय इ. बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. नांदेपेरा रोडवरील तिरुपती मंगल कार्यालयाने हे सर्व नियम धाब्यावर बसवले आहे.
आज रविवारी नांदेपेरा रोडवरील तिरुपती मंगल कार्यालयात एक लग्न समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात व-हाडी मंडळी गोळा झाली आहे. संचारबंदीत प्रशासन सर्वसामान्यांना दंड आकारत आहेत. मग मंगल कार्यालयावर कोणतीही कारवाई का नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. वृत्त लिहे पर्यंत सदर मंगल कार्यालयात धुमधक्यात लग्नकार्य सुरू होते. याशिवाय छोरिया ले आउट इथेही समोरून शटर बंद करून आत लग्न कार्य सुरू होते.
हे देखील वाचा