घोन्सा येथे गोठ्याला भीषण आग, 4-5 लाखांचे नुकसान

7 जनावरे, कोंबड्या, अवजारे, चा-यासह गोठ्यातील सर्वच साहित्य भस्मसात

0

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील घोन्सा येथे सोमवारी मध्यरात्री गोठ्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात संपूर्ण गोठा व गोठ्यातील सर्व साहित्य भस्मसात झाले. आगीत 7 जनावरे होरपळली. त्यातील दोन जनावरे जागीच ठार झाले. यासह कोंबड्या, गोठ्यातील चारा, स्प्रिंकलर पाईप, अवजारे असे सर्व साहित्य भस्मसात झाले. आगीमुळे सुमारे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एमएसईबीच्या तारांमधून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सविस्तर वृत्त असे की घोन्सा येथे गजानन महाराज मंदिराच्या मागच्या बाजुला विमल कान्होबाजी कोटरंगे या महिलेचे शेत आहे. रात्री 9 वाजता साखरा फिडर वरून शेतातील लाईट सुरू केली जाते. शेतातील कम्पाउंडच्या बाजुलाच गोठा आहे. दरम्यान कम्पाउंडच्या तारांमधून शॉर्ट सर्किट होऊन गोठ्यातील चा-याला आग लागली. तिथून आग पसरत वाढत गेली, असा प्राथमिक अंदाज आहे.

हिवाळा असल्याने गाव सुनसान होते. रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास गावातील एक व्यक्ती लघूशंकेसाठी उठला असता त्याला कोटरंगे यांच्या शेतात आगीचे लोंढे दिसले. त्यांनी ताबडतोब याची माहिती शेजा-यांना व शेतमालकांना दिली. गावकरी त्वरित आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्थानिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र कम्पाउंडला करंट असल्याने आग विझवण्यास अडचण येत होती. त्यानंतर महावितरण (एमएसईबी) ला याची माहिती देऊन लाईट बंद करण्यात आली. मात्र तोपर्यंत जवळपास सर्वच साहित्य जळून खाक झाले होते.

प्रचंड जीवित हानी
या आगीत 7 जनावरे होरपळली. यात एक गाय आणि गोरा जागीच ठार झाले. सकाळी आणखी एक गाय आणि एक बैल ठार झाला. तर 3 जनावरांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. 20 कोंबड्या आणि त्यांचे पिलं देखील आगीत होरपळून ठार झाले. यासह रासायनिय खतं. स्पिंकलर पाईप, जनावरांचा चारा, शेतीचे अवजारे, तीन लोखंडी पत्रे इत्यादी सर्व साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे 4 ते 5 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

ही आग इतकी भीषण होती की आज दुपार पर्यंतही गोठ्यातील आग धुमसत होती. दरम्यान महसूल विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. महिला शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

महावितरणचा वारंवार भोंगळ कारभार
या भीषण आगीमुळे महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या आधीही घोन्सा येथे डीपीमधून स्पार्किंग होऊन आग लागली असल्याची माहिती गावक-यांनी दिली आहे. वेळोवेळी तक्रार करूनही समस्या न सोडवल्याने वारंवार स्पार्किंग आणि शॉर्ट सर्किटच्या घटना घडत असल्याचे गावकरी सांगतात. परिणामी ही भीषण आग लागल्याचा गावक-यांचा आरोप आहे.

लिंकवर आगीचा व्हिडीओ…

हे देखील वाचा:

नगरपालिकेचा कारभार अद्यापही प्रभारी भरोसे

हे देखील वाचा:

कोरोनाचे तांडव सुरूच… आज 11 पॉजिटिव्ह

Leave A Reply

Your email address will not be published.