नगरपालिकेचा कारभार अद्यापही प्रभारी भरोसे

संदीप माकोडे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून रुजू

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात नगर पालिकेतील मुख्याधिकारी पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. पालिकेला लवकरात लवकर कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावे अशी अपेक्षा असताना यावेळीही प्रभारी मुख्याधिकारी नेमण्यात आले आहे. झरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी संदीप माकोडे यांना वणीचा प्रभार देण्यात आला आहे. सोमवार पासून ते पालिकेत रुजू झाले आहेत. पण कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नगरपालिके अंतर्गत येणारी शहरातील विकास कामे रडखडली आहे.

संदीप बोरकर हे वणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते. त्यांची दिनांक 11 ऑगस्ट 2020 ला बदली झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार महेश रामगुंडे यांची प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली. दिवाळी नंतर जिल्हा प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला. वारंवार मुख्याधिकारी यांचे प्रभार बदलत असल्याने विकास कामांना दिरंगाई होत आहे.

नागरिकांची कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याची मागणी
वणीकरांच्या वतीने कायमस्वरुपी मुख्याधिकारी द्यावा या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊन मागणी करण्यात आली. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करून नगरपालिकेला प्रभारी मुख्याधिकारी देऊन पाने पुसली जात आहे. त्यातच प्रभार ही सारखा बदलत असल्याने वणीकर नाराजी व्यक्त करत आहे.

हे पण वाचा: 

कोरोनाचे तांडव सुरूच… आज 11 पॉजिटिव्ह

हे पण वाचा: 

झरी तालुक्यात राजरोसपणे रेती चोरी सुरू

 

Leave A Reply

Your email address will not be published.