मार्डी-चोपण रोडवर मटका पट्टी चालकास अटक

मारेगाव पोलिसांची कारवाई

भास्कर राऊत, मारेगाव: मार्डी-चोपण रस्त्यावर धाड टाकून पोलिसांनी एका मटक पट्टी घेणा-या इसमास ताब्यात घेतले. दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीकडून पट्टी लिहिण्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली.

आज रविवारी दुपारच्या सुमारास मारेगाव पोलिसांचे पथक हे देवी विसर्जनाच्या निमित्ताने मार्डी बीटमध्ये पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना खबरीकडून मार्डी-चोपण रोडवर मटका पट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथक हे मार्डी-चोपण रोडवर गेले. रस्त्यालगत एक व्यक्ती मटका पट्टी घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली. आरोपीकडे पट्टी लिहिण्याचे साहित्य व 480 रुपये नगदी असा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे. 

हे देखील वाचा:

Ankush mobile

अखेर विदर्भा नदीत बेपत्ता झालेल्या इसमाचा आढळला मृतदेह

One Day Ad

धावत्या दुचाकीवर आदळला रोही, साईनगरी येथील तरुणाचा मृत्यू

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!