नगरसेवक विरुद्ध नगराध्यक्ष वाद पेटला, निवडणूक की आणखी काही…?

नगरसेवकाची नगराध्यक्षांविरोधात तक्रार, अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

जितेंद्र कोठारी, वणी: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संबंधी घोषणा होतच वणीचे राजकारण तापले आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या एका नगरसेवकाने थेट नगराध्यक्ष विरुद्द वणी पोलीस ठाण्यात जीवितास धोका असल्याची तक्रार नोंदविल्याने एकच खळबळ माजली आहे. धीरज दिगांबर पाते असे तक्रारकर्ता नगरसेवकाचे नाव आहे. या प्रकरणी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तक्रारीमध्ये नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना तक्रारकर्ता नगरसेवक धीरज पाते यांनी वणी नगरपरिषदने 3 मार्च 2018 रोजी आयोजित सभेत घेण्यात आलेले ठरावाची सत्यप्रत मागितली होती. या विषयी 16 सप्टें रोजी नगराध्यक्षांनी केबिनमध्ये बोलावून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. असा आरोप नगरसेवक धीरज पाते यांनी केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे विरुद्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

तक्रारीला निवडणुकीची किनार ?
या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ तर उडाली शिवाय याला आगामी निवडणुकीची किनारही असल्याचे बोलले जात आहे. धीरज पाते हे भाजपच्या चिन्हावर प्रभाग क्रमांक 7 मधून निवडून आले होते. मात्र पाते यांच्यावर 2018 मध्ये एका प्रकरणी गंभीर आरोप झाल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती. तेव्हापासून पाते आणि नगराध्यक्ष यांच्यामध्ये कलगीतु-याला सुरुवात झाली होती. 

येत्या 2 ते 3 महिन्यात वणी नगर परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. गेल्या महिन्यापासूनच धीरज पाते विरुद्ध नगराध्यक्ष असा कलगीतुरा रंगत आहे. कचरा उचलण्यास नगराध्यक्ष सहकार्य करीत नाही असा आरोप ठेवत धीरज पाते यांनी त्यांच्या परिसरातील कचरा स्वखर्चाने उचलला होता. तेव्हापासूनच हा कलगीतुरा सुरू झाला होता. आता हा कलगीतुरा थेट पोलिसांमध्ये तक्रार करण्यापर्यंत पोहोचला आहे. आता या प्रकरणी आणखी काय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा:

वैरागडे गुरुजी फाउंडेशनची स्थापना

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.