भाकपच्या नेत्यासह अनेकांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश

माकपला विधानसभा क्षेत्रात मिळाले बळ

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील भाकपचे नेते श्रीकांत तांबेकर व पुंडलिक ढुमने यांचे सोबत अनेक कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ऍड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सभासद कॉ. ऍड. दिलीप परचाके व जिल्हा उपाध्यक्ष कॉ. मनोज काळे यांचे नेतृत्वात पक्षाचा सभासद फार्म भरून सदस्यत्व स्वीकारले.

यावेळेस कॉ. ऍड. कुमार मोहरमपुरी, कॉ. ऍड. दिलीप परचाके व कॉ. मनोज काळे यांनी माकप च्या ध्येय धोरणाची, विचारसरणीची व सध्या देशातील राजकीय परिस्थितीची माहिती देण्यात आली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सभासद फार्म भरून सामील होणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने पुंडलिक ढुमने, श्रीकांत तांबेकर, धनंजय भोयर, बहिनाबाई चौधरी, प्रफुल आदे, नानाजी घोटेकर, सुरेश भोयर, वासुदेव रोडे आदी व अन्य जणांच्या समावेश आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कामगार, शेतकरी व कष्टकरी वर्गासाठी असलेली विचारसरणी व शिस्त आणि अनुशासित संघटन बांधणी आणि जिल्ह्यात झालेल्या कॉ. शंकरराव दानव यांच्या जडणघडणीत निर्माण झालेला कार्यकर्ता वर्ग त्यांच्या निधनानंतरही तेवढ्याच ताकदीने उभा राहून कष्टकरी वर्गाचा एकमेव साथी म्हणून लाल झेंडा घेऊन संघर्ष करीत वाटचाल करीत आहे. अशी मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी मारेगाव तालुका नेते कॉ. रामभाऊ जिड्डेवार, कॉ. नंदू बोबडे उपस्थित होते.

Comments are closed.