सुगंधीत तंबाखू विक्री प्रकरणातील आरोपीला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दोन आरोपी फरार, तर मटका अड्डा प्रकरणातीलही दोन आरोपी फरार

विवेक तोटेवार, वणी: 29 जानेवारीला पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाने वणीतील चार मटका जुगारावर व दोन अवैध तंबाखू विक्रेत्यांच्या दुकानावर व घरी धाड टाकली होती. यात चार मटका अड्ड्यावरून 4 लाख 57 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व 41 आरोपींना अटक करण्यात आली होती, तर दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. अवैध तंबाखू विक्रेत्यावर टाकण्यात आलेल्या धाडीत एका ठिकाणाहून 4 लाख 63 हजार 730 रुपयांचा तर दुस-या ठिकाणाहून 4 लाख 16 हजार 542 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तंबाखू विक्रीच्या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली तर दोघे फरार झाले आहे. अटकेत असलेल्या आरोपीला आधी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता आरोपीला 15 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Podar School 2025

उपमहानिरिक्षकाच्या पथकाने सिंधी कॉलनीत सुगंधीत तंबाखू विक्रेत्याच्या घरी व दुकानात छापा मारला. साई ट्रेडर्स या दुकानात धाड टाकून पोलिसांनी 47 हजार 188 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ठिकाणाहून अनिल व्यवहारीमल नागदेव याला अटक करण्यात आली. तर सिंधी कॉलनी येथील एका राहत्या घरी धाड टाकून पथकाने 4 लाख 16 हजार 542 रुपयांचा सुगंधित तंबाखू व गुटका जप्त केला. या ठिकाणी सुरेश परेलाल गोधणी व दीपक कवडू चावला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही फरार होण्यात यशस्वी झाले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या तिघांवरही भादंविच्या कलम 188, 272, 273, 328 नुसार गुन्हा नोंद केला आहे. अटकेत असलेला आरोपी अनिल नागदेव याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. बुधवारी दिनांक 2 फेब्रुवारीला आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 15 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सूनवली आहे.

याच पथकाने चार मटका अड्ड्यावर धाड टाकली. यात दीपक टॉकीज परिसरात टाकलेल्या धाडीत चार मोबाईल, 5 दुचाकी, व 95 हजार 400 रुपये रोख व 12 आरोपींना अटक करण्यात आली तर दोन आरोपी फरार झाले. तर सिंधी कॉलनीतील धाडीत 3 मोबाईल व 20 हजार 560 रुपये असं एकूण 24 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सात आरोपींना अटक करण्यात आली.

एकता नगर परिसरातील नगर परिषद गळ्यातील मटका अड्ड्यावरील धाडीत एकूण 1 लाख 27 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत 17 आरोपींना अटक केली. तर एकता नगर परिसरातील दुसऱ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत 9 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत 5 आरोपीना अटक केली आहे. मटका अड्ड्यावर पडलेल्या या धाडीत एकूण 4 लाख 57 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर 41 आरोपींना अटक करण्यात आली व दोन आरोपी फरार आहेत. या 43 आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ), 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वानखेडे, इकबाल शेख, प्रदीप ठाकरे, रवी इसनकर करीत आहे.

Comments are closed.