माजी सैनिक बालाजी सखाराम काकडे यांचे निधन

आज 10 वाजता मोक्षधाममध्ये होणार अंत्यसंस्कार

विवेक तोटेवार, वणी: भारतीय लष्करात राहून देशाची सेवा करणारे बालाजी सखाराम काकडे (77) यांचे बुधवार 2 फेब्रुवारीला सायंकाळी 8.30 ला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंतिम संस्कार गुरुवारला 10 वाजता वणीच्या मोक्षधाम येथे होणार आहे. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा व नातवंड असा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा 3 फेब्रुवारी ला सकाळी 10 वाजता त्यांच्या घरून टिळक नगर येथून निघणार आहे.

Comments are closed.