अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 वी जयंतीचे औचित्य साधून वणी उपविभागातील मादगी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मादगी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे 6 ऑगस्ट 2023 रोजी वणी येथील वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी हॉल मध्ये या गुण गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच विपरीत परिस्थितीत मेहनत करून जिद्दीने पुढे जाण्याऱ्या इयत्ता 10 वी, 12 वी व विविध परीक्षेत तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील मादगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल.

सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नायब तहसीलदार चरणदास कोंडावार राहणार आहे. गुण गौरव सोहळ्याचा उद्घाटन मोची, मादगी, मादरु, मादिगा, महासंघ (M4) चे सचिव सुनिल मिद्दे यांच्या हस्ते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी गणेश किंद्रे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लो. टी. महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. करमसिंग राजपुत, नागपुर उच्च न्यायालयात अधिवक्ता ऍड. गजानन अंबलवार व मोची, मादगी, मादरु, मादिगा महासंघचे उप कोषाध्यक्ष मुरलीधर लाटेलवार हे असणार आहे.

वणी उपविभागात पहिल्यांदाच मादगी समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव व विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा मादगी समाजाचा वतीने संपन्न होत आहे. तरी समस्त पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष निलेश परगंटीवार, उपाध्यक्ष चरणदास कोंडावार, सचिव सुरज चाटे, सहसचिव रवि कोमलवार, कोषाध्यक्ष नथ्थुजी नगराळे, प्रकाश तालावार (शिक्षक), राकेश शंकावार, अरुण एनपल्लीवार, विक्की परगंटीवार, विजय कंडेवार, शिवकुमार नलभोगे, प्रभाकर लिक्केवार, कैलास पौन्नलवार, नागेश मोहरले या आयोजकांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.