निळापुर येथील युवा शेतकऱ्याची कॅन्सरशी झुंज संपली

वणी बहुगुणी डेस्क : तालुक्यातील निळापूर येथील युवा शेतकरी सूरज उद्धव खामनकर (32) यांचा गुरुवार 3 जुलै रोजी सकाळी निधन झाला. सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर सूरज मागील 2 वर्षापासून कर्करोग (Cancer) या आजाराने पिडीत होता. त्याचा नागपूर येथे उपचार सुरु होता. परंतु गुरुवार सकाळी त्याची कॅन्सर आजाराशी झुंज संपली. सूरज यांच्या पार्थिव देहावर निळापुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व लहान मुलगा आहे.

Comments are closed.