तालुका प्रतिनिधी, वणी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखात मायक्रो एटीएमची सुविधा त्वरित सुरू होणार आहे. त्यासाठी वणी विभागातील सदर बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापक आणि लिपिकांना शनिवारी वणी येथे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. अशी माहिती वणी विभागाचे प्रभागीय अधिकारी दीपक मोहितकर यांनी दिली.
वणी विभागात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण १७ शाखा आहेत. सदर बँकेच्या खातेदारांना एटीएम कार्ड उपलब्ध करून दिली आहे. मात्र सदर बँकेची स्वतःची सुविधा उपलब्ध नसल्याने अन्य एटीएम मधून व्यवहार करावे लागत आहे. शनिवारी बँकेच्या वणी विभागीय कार्यालयात प्रसाद राजे टेक्निकल इन्स्टिट्यूट द्वारा मायक्रो एटीएम हाताळणी संबधी माहिती दिली.
यावेळी वणी विभागातील जिल्हा बँक शाखांचे व्यवस्थापक आणि लिपिक हजर होते. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांना मायक्रो एटीएम उपलब्ध झाले आहे. त्वरित सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता खातेदारांना मायक्रो एटीएम मधून विक्री व्यवहार, रक्कम चौकशी यासह रक्कम काढता येणार आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)