सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून दोन किमी अंतरावर असलेल्या परसोडा घाटावरून लाखोंची रेतीचोरी झाली झाली आहे. परसोडा घाटावरून पैनगंगा नदी पात्रात जाण्याकरिता रेटिचोरट्यानी नदीतील प्रवाह बंद करून रेतीचोरी सुरू केली आहे. नदीतून पात्रात जाण्याकरिता ट्रॅक्टरने मोठमोठे दगड टाकून नदीचे पाणी अडवून ट्रॅक्टर नेले जात आहे. पैनगंगा नदीपात्रात मुकुटबन व पिंपरड येथील 7 ते 8 ट्रॅक्टर मालक हे दररोज रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 30 ते 40 ब्रास रेतीची चोरी करून 5 हजार प्रमाणे विकत आहेत. यातून शासनाला महसुलाला लाखोंचा चुना लागत आहे.
नदी पात्रात रेतीचोरट्यांनी 3 फूट खोल व 50 ते 100 फूट लांब असे खड्डे करून रेती भरून पात्र खाली करीत आहे. 7 ते 8 रेती चोरट्यांची गँग असून रात्री रेती चोरी करताना मुकुटबन गावात एक व्यक्ती परसोडा ते रेल्वेपुला जवळ मोटर सायकलने चकरा मारत ट्रॅक्टर चालकांना लोकेशन देत असतो. व त्याच पद्धतीने रेती चोरी सुरू आहे.
ट्रॅक्टर नदीच्या पात्रात फसू नये याकरिता टिनाचा अर्धे भाग करून रस्त्यावर टाकण्यात आले आहे. शासनाची गौण खनिजांची चोरी एवढ्या प्रमाणात होत असताना याला आळा का घालण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रेती चोरीच्या व्यवसायातून चोरट्यांनी चांगलीच माया गोळा केली आहे. खुलेआम होणाऱ्या रेतीचोरी व तस्करीला अभय कुणाचे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रेतीचोरी व तस्करीत संमधीत महसूल व पोलीस विभाग चुप्पी साधून का बसून आहे हे एक कोडेच आहे.
काही दिवसांपूर्वी या बाबत नायब तहसिलदार रामचंद्र खिरेकर यांना माहिती मिळताच त्यांनी पटवारी व पोलीस पाटील यांना आदेश देऊन घाटावर जाणाऱ्या मार्गावर 4 ते 5 फुटाचे काही खड्डे करण्यास सांगितले व खड्डे करण्यात आले. परंतू रेती चोरट्यानी हे खड्डे रातोरात बुजविले व पुन्हा रेतीचोरी व तस्करी सुरू केली आहे. रेतीचोरी करताना पाळत ठेवणारे व खड्डे बुजविणार्यावर तसेच ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी होत आहे.
रेतीचोरट्यावर महसूल व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तसेच काही कर्मचाऱ्यांशी मधुर समंध असल्याने रेतीचोरीत प्रचंड वाढ झाल्याची ओरड जनता करीत आहे. पोलीस विभागाने यापूर्वी ट्रॅक्टर व ट्रकवर कार्यवाहीचा सपाटा लावला होता परंतु आता कार्यवाही थंड का झाल्या असा प्रश्न उपस्थित करून शंकेला पेव फुटले आहे.
तालुक्यात वणी,कोरपना,घुगूस येथून यापूर्वी व आजही रेतीचे ट्रक मोट्या प्रमाणात येत होते व येत आहे. मग आज हे ट्रक महसूल व पोलीस विभागांना का दिसत नाही? असाही प्रश्न उपस्थीत होत आहे. परसोडा घाटावरून रेतीचोरी करणाऱ्या चोरट्यांची नावे संबंधीत विभागाला माहीत आहे तरी त्यांना पकडून त्यांच्या वाहनावर दंड व चालक मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी होत आहे.
हे देखील वाचा: