अखेर नदीपात्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

भुरकी गावात पसरली शोककळा

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील भुरकी घाटावर रविवारी 7 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास 4 तरुण नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील एक तरुण पोहताना अचानक बेपत्ता झाला. काल संध्याकाळपासून शोधमोहीम सुरू होती. अखेर त्या तरुणाचा सकाळी 10 वाजताच्या दरम्यान मृतदेह आढळून आला.

रविवार 7 मार्च रोजी भुरकी येथे एका घरी लग्न होते. सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास नांदेपेरा येथून लग्नकार्यासाठी आलेले 2 तरुण, वणी येथून गेलेला एक तरुण व भुरकी येथील गणेश गजानन पेंदोर (26) हे चौघे भुरकी येथील नदीपात्रात पोहण्यास गेले. पोहता पोहता गणेश गजानन पेंदोर (26) हा तरुण घाटातच अचानक गायब झाला. गणेश दिसत नसल्याचे त्याच्या इतर सहका-यांनी गदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही.

अखेर गणेशच्या मित्रांनी सदर बाब गावक-यांना सांगितले. गावक-यांनी तातडीने नावाड्यांना सोबत घेऊन शोधमोहीम सुरू केली.  संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होती. परंतु गणेश आढळून आला नाही. अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते.

सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली होती. दरम्यान सकाळी 10 वाजताच्या दरम्यान गावातील काही व्यक्तींना एक मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. त्यांनी मृतदेह बाहेर काढला असता सदर मृतदेह गणेशचा असल्याचे लक्षात आले. दरम्यान पोलीस विभागाचे महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. गणेशच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

हे देखील वाचा:

तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण, ग्रामीण भागात वाढतोय कोरोना

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.