अल्पवयीन मुलगा घरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी : मच्छी पकडायला नदीवर जाण्यास आईने नकार दिला म्हणून वाद करून रागाच्या भरात अल्पवयीन मुलगा घरून निघून गेला. बराच वेळ उलटूनही मुलगा परत घरी न आल्याने आजूबाजूला, मित्रांकडे व नातेवाईकांकडे शोध घेतला असता मुलगा मिळून आला नाही. अखेर आईने वणी पोलीस स्टेशन गाठून तिचा 16 वर्षाचा अल्पवयीन मुलगा घरून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Podar School 2025

फिर्यादी महिला वणी येथील तेलीफैल भागात वास्तव्यास असून तिला एक मुलगी व मुलगा आहे. दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान लहान मुलगा तिच्याजवळ आला व नदीवर मच्छी पकडायला जातो असे सांगितले. आईने नदीवर जाऊ नको असे म्हटले. यावरून दोघांमध्ये वाद झाला व रागाच्या भरात मुलगा घरून निघून गेला. अश्या प्रकारच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 363 अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.