अल्पवयीन तरुणीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार

मुलीच्या आईवडिलांची पोलिसात तक्रार

0 2,487
विवेक तोटेवार, वणी: वडगाव (मार्डी) तालुका मारेगाव येथील एका 10 व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वडगाव (मार्डी) येथील तरुणीच्या आई वडिलांनी वणी पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरून वणी पोलिसात संशयित आरोपीवर कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, वडगाव येथील रहिवासी असलेले गोवर्धन (नाव बदललेले) यांना दोन मुली आहे. त्यातील मोठी मुलगी सीमा (बदललेले नाव) ही 10 व्या वर्गात शिक्षण घेते. जनार्दन व त्याची पत्नी ही मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा गाडा ओढतात. 19 फेब्रुवारीला सीमा व तिचे वडील त्यांच्या साळ्याच्या गावाला चंद्रपूर येथे जाण्यासाठी निघाले. ते दोघेही ऑटोने वणीला आले. वणी बस्थानकावर पोहचल्यावर चंद्रपूर बसची वाट पाहत बसले होते. बस यायला वेळ असल्याने वडील सीमाला थांबवून लघुशंकेला गेले. परत येताच त्यांनी बघितले की, थांबवल्या ठिकाणी सीमा नाही.
त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, विचारपूस केली. परंतु तिचा पत्ता लागला नाही. वडील पुन्हा वडगावला गेले. घरी पोहचल्यावर त्यांनी नातेवाईकांना फोन करून विचारणा केली. परंतु सीमाचा पत्ता लागला नाही. तेव्हा त्यांनी पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. या दोघांनीही ज्यावेळी तिच्या लग्नाचा विषय काढला होता त्यावेळी तिने म्हटले होते की, ‘मी लग्न करणार तर सुरज घात्रक राहणार मार्डी याच्यासोबत नाहीतर करणार नाही’.

यावरून तिच्या वडिलांना संशय आला की, सीमा हिला सूरज घात्रक (25) राहणार मार्डी याने फूस लावून पळवून नेले असावे. त्याच वेळी आई व वडिलांनी वणी पोलीस ठाणे गाठून सूरज घात्रक याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात सूरज विरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी विजयमाला रिठे करीत आहे.

Comments
Loading...