दिग्रसमध्ये रविवारी भव्य रोगनिदान व उपचार शिबिर

रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन

0 867

दिग्रस: दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल ऍन्ड क्रिटीकल केअर सेंटर येथे रविवारी दि. २४ फेब्रुवारीला भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. या शिबिरात विविध विषय आणि रोगावरील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.

या शिबिरात पोट व आतड्याची दुर्बिणीद्वारे तपासणी, मधुमेह व थायरॉईड तपासणी, मेंदुविकार व मणक्यांची तपासणी, मुळव्याध व भगंदर तपासणी, दंतरोग तपासणी, ह्रदयरोग तपासणी, नेत्रविकार तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, मूत्रपिंड व किडनी रोगांची तपासणी, त्वचारोगांची तपासणी ई. तपासण्या नाममात्र शुल्कात केल्या जाणार आहेत.

ग्रामीण भागात अद्याप अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. अत्याधुनिक उपकरणाद्वारे तपासणी साठी रुग्णांना मोठ्या शहरात जावे लागते. तिथे शुल्क भरमसाठ असल्याने गोरगरीब रुग्णांना मोठ्या शहरात जाऊन उपचार करणे शक्य नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना माफक दरात उपचार मिळावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ. श्याम जाधव यांनी दिली.

सदर शिबीरात तपासणी नंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया व पुढील उपचाराची गरज असेल. त्यांना सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया व पुढील उपचारांची सोय करण्यात आली आहे. तसेच शिबिराच्या दिवशी रुग्णांची नोंदणी संख्या जास्त झाल्यास उर्वरित रुग्णांना तपासणीसाठी पुढील तारीख देण्यात येणार आहे.

या शिबिराचा मानोरा, दिग्रस तथा परीसरातील सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक डॉ. प्रशांत रोकडे, डॉ. शाम जाधव, डॉ. संदीप दुधे, डॉ. आशिष शेजपाल, डॉ. श्रीकृष्ण पाटील यांनी केले आहे. शिबिराविषयी अधिक माहितीसाठी ९४२२९२२८६३, ९०२१०१४५१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Loading...