अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो काढून मारहाण

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजूर (गोटा) येथील एका अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये अश्लिल फोटो काढल्यावरून दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. कुटुंबियांना मारण्याची धमकी देणे, छेड काढणे अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तक्रारींनुसार अल्पवयीन मुलगी ही घरी आंघोळ करीत असताना आरोपी संजय राऊत यांनी तिचे फोटो काढले. ५ मार्च रोजी सदर मुलीचा मुकुटबन येथे दहावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. पेपर सोडवून मुलगी बाहेर आली असता तिला तिची आजी प्रेमीला गेडाम भेटली. तुझा मावसा मरण पावला मी चंद्रपूर चालली असे सांगून ती चंद्रपूरला निघून गेली. थोड्याच वेळात आरोपी संजय राऊत तिच्या घरी आला. तुझे काका दुकानात बसून आहे तुला बोलवले असल्याचे सांगून तो तिला दुकानात घेऊन गेला.

दुकानात मुलीचे काका नसून दुसरी आरोपी शारदा बेद्रे होती. या दोघांनी तिला दुचाकीवर बसून गणेशपूर येथील जंगलात नेले. तिथे तिला मारहाण करण्यात आली. तसंच तिला धमकी दिली की आम्ही सांगतो तसे कर अन्यथा तुझे आंघोळ करीत असलेला विडिओ सोशल मीडियावरून व्हायरल करतो. मुलगी घाबरल्याने तिने त्यांच्या धमकीला सहमती दर्शवली. दोन्ही आरोपींनी मुकुटबन सोडले.

२१ मार्चला पीडित मुलगी आपल्या लहान भावासोबत घरी झोपून असताना आरोपी संजय राऊत व बेद्रे यांनी रात्री ११ वाजता झोपेतून उठवून तिला गावातील प्रवीण खडसे नामक तरुणाला फसव असे सांगितले, मात्र तिने यायस नकार दिला. त्यामुळे तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून तिला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. अशी तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून संजय राऊत व शारदा बद्रे विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

शारदा बेंद्रे राहणारर राजूर ही महिला आशा वर्कर असून २ एप्रिलला दुपारी १२.३० वाजता दरम्यान गावातीलच बाबाराव पिसाराम खडसे, प्रवीण नानाजी खडसे व निलेश अशोक खडसे हे तिघे अर्जदार शारदा बेद्रे ही अंगणात मिरची निवडत असताना अचानक तिथे आले. त्यांनी तिचे केस ओढत तिला घरात नेऊन मारहाण केली व गळ्यातील पोत खिशात टाकली. अश्लील भाषेत तसेच जातीवाचक शिवीगाळ करून पुन्हा मारहाण करून तुझा खून करतो अशी धमकी दिली.

तिघांच्या तावडीतून वाचून आरडा ओरड करत घराच्या बाहेर आली असता तिघेही पळून गेले. अशी तक्रार तिने दिली आहे. तिघांवर ऍट्रोसिटी सह विनयभंग व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गुलाब वाघ सह पी.एस.आय नितीन चुलपार, प्रवीण ताडकोकुलवार करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.