मुकुटबनच्या दोन युवकांचा अमरावती जिल्ह्यात सत्कार

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबनच्या प्रफुल भोयर व प्रियल पथाडे या दोन युवकांचा अमरावती सत्कार करण्यात आला. एक एप्रिल रोजी बडनेरा जिल्हा अमरावती येथे बडनेरा-अमरावती रक्तपेढी सोशल गृप, जयपाल उत्तमानी रुग्ण मित्रमंडळ व छत्रपती विचार मंच यांच्यातर्फे रक्तदान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच गरजू रुग्णांना वेळोवेळी रक्तदाते किंवा रक्त उपलब्ध करून देणाऱ्या टिम्स व गृप्सचा सत्कार करण्यात आला.

संपूर्ण टिमने रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेने उपलब्ध करून दिल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला  आमदार रवी राणा, भाजपा महा. प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, नगराध्यक्ष जयंत डेहणकर, बडनेरा पोलीस निरीक्षक गोपाल भारती, ज्युनिअर अमिताभ बच्चन, ज्युनिअर जॉनी लिवर, कवी मंगेश ठाकरे, इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.