अडेगाव येथे अल्पवयीन मुलीची तरुणाने काढली छेड

बाजारात मुलीचा मोबाईल नंबर मागणे पडले महागात

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडेगाव येथे एका अल्पवयीन मुलीची एका तरुणाने छेड काढली. सदर घटना 14 जुलै रोजी दुपारी 6 वाजताच्या दरम्यान येथे घडली. याबाबत मुलीने मुकुटबन पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध गुन्हे दाखल केले. तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Podar School 2025

तक्रारीनुसार, अडेगाव येथील एक अल्पवयीन मुलगी आपल्या भावासोबत संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान भाजीपाला घेण्याकरिता गावातील बाजारात गेली होती. दरम्यान मुकुटबन येथील आरोपी राहुल (26) हा अडेगाव येथे आला होता. त्याने सदर मुलीचा पाठलाग केला. तसेच तू मला आवडतेस असे म्हणत तिचा मोबाईल नंबर मागितला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घरी आल्यावर ही माहिती मुलीने आपल्या आईला सांगितली. मुलगी व आई संध्याकाळी मुकुटबन पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी कलम 354(ड) 504, कलम 12 बाललैंगिक संरक्षण अधिनियम कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड करीत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.