विवेक तोटेवार, वणी: शहरात आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा एका तरुणाने विनयभंग केला. 15 डिसेंबर गुरुवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडिता ही काही दिवसांसाठी आपल्या आजी व मामाकडे राहण्यास आली. तेव्हापासूनच आरोपीची वाईट नजर तिच्यावर होती. आरोपी शेखर वाईकर (20) हा तिचा नेहमीच पाठलाग करीत होता तसेच बोलण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु पीडितेने त्याला प्रतिसाद दिला नाही. शेवटी 15 डिसेंबर रोजी शेखर हा तिच्या मामाच्या घरी येऊन मी हिचे लग्न कुणाशीही होऊ देणार नाही हिच्यासोबत मीच लग्न करणार असल्याची धमकी दिली. घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने आपल्या मामासह वणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलीस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम 354 (ड), 506 व सहकलम 12 पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post
Comments are closed.