नागेश रायपुरे, मारेगाव: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणावर पोस्कोसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपीचे नाव विकास विठ्ठल कनाके (24) असून तो तालुक्यातील रोहपट येथील रहिवाशी आहे.
तक्रारीनुसार, पीडीत मुलगी ही दहाव्या वर्गात शिकत असून ती गोंडबुरांडा येथील रहिवाशी आहे. सध्या वर्ग ऑनलाईन सुरू मुलीच्या पालकांनी मुलीला मोबाईल घेऊन दिला होता. मुलीने त्यात फेसबुक इन्स्टॉल केले होते. तिची काही दिवसांपूर्वी फेसबुकवरून विकास कनाके सोबत ओळख झाली. फेसबुकवरून ते कायम चाटिंग करायचे. त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबरही एक्स्चेंज केला. त्यानंतर ते फोनवरून तासंतास एकमेकांशी बोलायचे. पुढे त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ते दोघे पीडितेच्या आजोबाच्या शेतात एकमेकांना भेटत.
गेल्या महिन्यात दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास आरोपी विकासने पीडितेला फोन करून तिच्या आजोबाच्या शेतात बोलावले. त्यानुसार पीडिता घरी कुणाला काही न सांगता ओरीपाला भेटायला शेतात गेली. तिथे आरोपी विकासने पीडितेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने त्याला विरोध केला. त्यामुळे आरोपीने मुलीचा लग्नाचे आमिष दाखवले व मुलीची संमती मिळवली. त्यानंतर विकासने पीडितेसोबत संबंध प्रस्तापीत केले व ते दोघेही घरी निघून गेले.
दोन दिवसांआधी दिनांक 18 जानेवारी रोजी विकासने पीडितेला फोन करून त्याचा यवतमाळला पेपर असल्याचे सांगितले. तो बाईकने एकटाच जाणार असून त्याने मुलीला सोबत येण्यास गळ घातली. मुलगी तयार झाली. त्याने मुलीला गोंडबुरांडा येथील बसस्टॉपवरून पिकअप केले व दोघेही बाईकवरून डबलसीट यवतमाळला गेले. तिथे विकासने मुलीशी अश्लिल चाळे केले असा आरोप तक्रारीत केला आहे. संध्याकाळी ते दोघेही यवतमाळहून परत गावी निघाले. रात्री 8 वाजताच्या सुमारास विकासने मुलीला गोंडबुरांडा येथे घरी आणून सोडले.
दरम्यान ही बाब पीडित मुलीच्या घरच्यांना कळली. त्यांनी तिला विचारणा केली असता तिने विकास बाबत सर्व घटनाक्रम तिच्या पालकांना सांगितला. लग्नाचे आमिष दाखवून शेतात अत्याचार केल्याप्रकरणी व यवतमाळ येथे नेऊन अश्लिल चाळे केल्या प्रकरणी तक्रार करण्यासाठी मुलीच्या पालकांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. आरोपी विकास विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विकास विठ्ठल कनाके (24) विरोधात भादंविच्या कलम 376, 376 (3), 417 व पोस्को (बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम) अंतर्गत कलम 4, 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जगदिश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी, जमादार मनोज बडोलकर करीत आहेत.
हे देखील वाचा: