अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-या मजनूला शिताफीने अटक

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर वेगवगळ्या गावी अत्याचार

0

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणे एका तरुणास चांगलेच महागात पडले असून या प्रेमवीराला मारेगाव पोलीसांनी शिताफीने पकडून बेड्या ठोकलेल्या आहेत.

Podar School 2025

“All is fair in love and war” असे आपण म्हणत असतो. असाच काहीसा किस्सा मारेगाव तालुक्यात घडलेला आहे. तालुक्यातील सराटी येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर राळेगाव तालुक्यातील खैरगाव (जवादे) येथील 22 वर्षीय सागर निवृत्ती मेश्राम याचा जीव जडला. ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये व्हायला लागले. अशातच सागरने या मुलीस लग्नाचे आमीष दाखवले. प्रमाच्या आकंठात पुर्णपणे बुडालेल्या या वयात बाकी गोष्टींचा विचार न करता लगेच या प्रेमविराने या मुलीला पळून जाऊ असे म्हणताच दोघेही तयार झाले. दि. 20 जुलैला दोघेही पळून गेले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घरची मंडळी संध्याकाळी घरी आल्यावर मुलगी घरी दिसली नाही. सगळीकडे शोधाशोध झाली. मित्रमंडळी, नातेवाईक यांनाही विचारपूस केली. मुलगी कुठेच आढळून न आल्याने शेवटी घरच्यांनी दि. 20 जुलैला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलीसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरती ठेवली.

अशातच पावसाळा आणि लॉकडाऊनचा फटका यामुळे दोघेही रुंझा ता. पांढरकवडा येथे आहेत असे कळले. मारेगाव पोलीसांनी पांढरकवडा पोलीसांच्या मदतीने सापळा रचत दोनही प्रेमवीरांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तर प्रेमवीराची रवानगी कोठडीत करण्यात आली. त्याचेवर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेणे, लैंगिक अत्याचार करणे,यानुसार पोक्सो अंतर्गत 4,8 व कलम 376 (2), (J) (N), 366(अ) कारवाई करण्यात आली.

ही कारवाई मारेगावचे पोलीस निरीक्षक जगदिश मंडलवार, राजेंद्र चांदेकर, नितीन खांदवे, विनेश राठोड, अजय वाभीटकर,राजू टेकाम यांनी केली.

मुलीनेच केला घरच्यांना फोन
मुलगी रुंझा येथे राहत असतांना तिनेच घरच्यांना फोन करून आम्ही रुंझा येथे आहोत असे सांगितले. घरच्यांनी ही बाब लगेचच पोलीसांना कळवत त्यांनी मदत मागीतली. पोलीसांनी लगेचच कारवाई करीत दोघांनाही मोठ्या शिताफीने पकडले. परंतु घरून पळून जाणाऱ्या मुलीनेच फोन का केला हे मात्र अजूनही उलगडलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.