जितेंद्र कोठारी, वणी : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातून गजाआड केला आहे. मंगेश रमेश भुत्तमवार (23) रा. सेवानगर, वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. पीडित मुलीच्या आईने नोंदविलेल्या तक्रार व मुलीने दिलेल्या बयानावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 363, 366 (अ), 376 व पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार मंगेश भुत्तमवार यांने ओळखीतील एका 17 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले. दम्यान 5 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता आरोपीने मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत 6 एप्रिल रोजी मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात मुलीला फूस लावून पळवुन नेल्याची तक्रार दाखल केली.
मागील एका महिन्यापासून पोलीस आरोपी व अल्पवयीन मुलीच्या शोधात होते. परंतु दोघांकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांची लोकेशन माहीत होत नव्हती. दि. 10 मे रोजी ठाणेदार रामकृष्ण महल्ले याना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पीएसआय प्रवीण हिरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावातून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला वणी न्यायालयात हजर करून 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळविली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रवीण हिरे करीत आहे.

हे देखील वाचा-