वणीत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल

0 1,642

वणी, विवेक तोटेवार: मंगळवारी 9 जुलै रोजी शहरातील सेवानगर भागातून एक अल्पवयीन मुलगी अचानक गायब झाली. तिला एका इसमाने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावराव (बदललेले नाव) हे सेवानगर भागात राहतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगी ही 17 वर्षाची असुन ती 10 वर्गात नापास झाली होती. त्यामुळे ती घरीच राहत असे. 9 जुलै मंगळवारी भावराव नेहमीसारखे कामाला गेले. यावेळी मुलगी आई व मुलगा हे घरीच होते. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मुलगी घरगुती वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली. परंतु ती घरी परत आली नाही.

भावराव व त्यांच्या सोबत इतरांनीही मुलीचा आजूबाजूला शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. घराजवळ राहणार एक मुलगा तिच्यासोबत नेहमी बोलत असल्याने त्यानेच तिला पळवून नेल्याच्या संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमविरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास विठ्ठल बुरेवार करित आहे.

Comments
Loading...