2 हजार कुटुंबांना डस्टबिनचे वाटप

मुकूटबन ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

0 378

सुशील ओझा, झरी: पावसाळा लागताच पावसामुळे गावातील नाल्या कचऱ्याने बुजणे ज्यामुळे संपुर्ण सांडपाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे सर्वसामान्यांना रोगराईला सामारं जावं लागतं. मुकूटबन येथे ५ वॉर्ड असून जवळपास १२ हजार लोकसंख्या आहे. प्रत्येक वॉर्डात घाण होऊ नये गावातील नाल्या कचऱ्यामुळे बुजू नये या उद्देशाने ग्रामपंचायत तर्फे २ हजार कुटुंबांना कचरा टाकण्याकरिता डस्टबिनचे वाटप करण्यात आले आहे.

घरातील कोणताही कचरा डस्टबिनमध्ये टाकून ग्रामपंचायतने कचरा टाकण्याकरिता ठेवलेल्या पाईप मध्ये टाकावे असे आवाहन करण्यात आले. पावसाळ्यात खरकटे, काडी कचरा, खराब भाजीपाला, अन्न, यामुळे माश्या मोठ्या प्रमाणात होऊन आजार बळावतात यांच्यावर रोख लावण्याकरिता तसेच संपूर्ण गाव स्वच्छ राहावे याच उद्देशाने डस्टबीन वाटप करण्यात आल्या.

सरपंच शंकर लाकडे व ग्रामपंचायत सदस्य यांनी निर्णय घेऊन गावात डसबिन वाटप केल्या जात आहे. ग्रामपंचायत ने गाव स्वच्छ व निरोगी राहण्याच्या उद्देशाने घेतलेला निर्णय योग्य असून या निर्णयावर ग्रामवासीयांकडून स्वागत होत आहे.

Comments
Loading...