जितेंद्र कोठारी, वणी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ताब्यातील अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. मुलींनी पलायन केल्याचे लक्षात येताच पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मुलीच्या शोधात तातडीने पोलीस पथक रवाना करण्यात आले. तब्बल 3 तासानंतर मुलीचा शोध घेऊन तिला परत ताब्यात घेण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वणी पोलीस स्टेशनमधून ताब्यातील व्यक्ती पळून जाण्याची ही दुसरी घटना आहे.
प्राप्त माहितीनुसार शहरातील तैलीफैल परिसरातील अल्पवयीन मुलगी घरुन बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या आईने दोन दिवसांपूर्वी वणी पोलीस ठाण्यात नोंदविली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करुन शोध घेण्यास सुरुवात केली. बुधवार 15 जून रोजी पोलिसांनी सदर मुलगी व संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते.
ताब्यातील मुलीची यवतमाळ येथे वैधकीय तपासणी करुन पोलिसांनी परत वणी ठाण्यात आणले. आज गुरुवारी सकाळी ताब्यातील मुलीने मासिक धर्म झाल्याची माहिती ड्युटीवरील महिला पोलीस कर्मचाऱ्याला दिली. त्यामुळे महिला पोलीस कर्मचारी हिने तिला स्वच्छतेसाठी बाजूच्या क्वार्टरमध्ये सोडले. मात्र त्याच वेळी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला चकमा देऊन मुलींनी तिथून पळ काढला. बराच वेळ होऊन मुलगी क्वार्टरमधून बाहेर आली नाही. तेव्हा त्या महिला पोलिसांनी तिला हाक मारली. परंतु उत्तर मिळत नसल्याने डोकावून पाहिलं असतं मुलगी गायब होती.
वणी पोलीस ठाण्यातील दुसरी घटना
वणी पोलीस स्टेशनमधून ताब्यातील व्यक्तींनी पोलिसांच्या हातात तुरी देऊन पसार झाल्याची मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 29 एप्रिल 2022 रोजी विवाहित महिलेवर दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी सौरभ उर्फ मिंटू बोरुले पाणी पिण्याच्या बहाण्याने ठाण्यातून पसार झाला होता.
Comments are closed.