शालेय विद्यार्थीनीला फूस लावून पळवले

ट्युशनला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही...

जितेंद्र कोठारी, वणी: 10 वर्गात शिकणारी विद्यार्थीनी ट्यूशनला गेली. मात्र ती घरी परतलीच नाही. वणीत शनिवारी ही घटना घडली. अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळवल्याच्या संशयावरून मुलीच्या पालकांनी याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की पीडित कुमारिका (16) ही मुळची बाहेर गावातील रहिवासी असून ती शिक्षणासाठी वणीत तिच्या एका नातेवाईकाकडे राहते. ती शहरातील एका शाळेत 10 व्या वर्गात शिकते. शनिवारी दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता सदर मुलगी ही ट्यूशनसाठी गेली होती. मात्र संध्याकाळ झाली तरी ती घरी परत आली नाही. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी याची माहिती तिच्या वडिलांना दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तिच्या वडिलांनी व नातेवाईकांनी मुलीबाबत मैत्रिणी तसेच इतर नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र त्यांना तिची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मुलीला कुणीतरी पळवून नेले असावे असा त्यांना संशय त्याला. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

 

Comments are closed.