अल्पवयीन आदिवासी मुलीवर सतत पाच वर्षे लेैंगीक अत्याचार
खोटं नाव सांगून, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची पीडितेची पोलिसात तक्रार
वणी: वणीतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत 5 वर्षे लैंगीक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. तसंच तिच्याशी गर्भपाताच्या गोळ्या देत बळजबरीने शारीरिक संबधी प्रस्थापित करण्यात आले, अशी तक्रार पीडितेने केली आहे. या प्रकरणी 23 वर्षीय आरोपी तरुणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शहरातील पंचशिल नगर भागात वास्तव्यास असलेली कुमारीका शहरातील नुसाबाई चोपने कन्या विद्यालयात शिक्षण घेत होती. सन 2013 पासून ती शाळेत जाण्याच्या मार्गावर एक तरूण नेहमी उभा रहात होता. एके दिवशी त्या तरूणाने पिडीतेला अडवून तिचे नाव विचारले, तिनेही त्याला नाव विचारले त्यावर त्याने अमीत असे नाव सांगितले. दरम्यान त्यांची ओळख झाली. मात्र नंतर सदर तरूणाचे नाव अमीत नसून जुबेर अकबर खान (23) असे असल्याचे तिला माहित पडले.
जुबेर रोज तिच्या मार्गावर उभा असायचा. असाच एक दिवस उभा असताना त्याने तिला दुचाकीवर फिरून येवू असे सांगून तिला भालर रोडवर घेवून गेला. तिथे गेल्यावर त्यांने अल्पवयीन असलेल्या आदीवासी मुलीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर जेव्हा वाटेल तेव्हा तो तिला गाडीवर बसवून भालर रोडवर घेवून जायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा.
काही दिवसानंतर तो तिला वाॅटर सप्लाय परिसरातील वरच्या माळ्यावरील एका घरात घेवून गेला, तिथेही त्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली. तरुणी वारंवार विरोध करायची मात्र नकार दिल्यास बदनामी करतो अशी धमकी त्यानं दिली. दरम्यान सतत पाच वर्षे त्यानं तिचे शारीरिक शोषण केले. त्यातच अल्पवयीन असलेल्या मुलीला त्यानं गर्भपाताचा गोळ्या सुध्दा खावू घातल्याचे तक्रारीतून म्हटले आहे.
वारंवार गोळ्या देणे आणि तिच्याशी शारीरिक संबध प्रस्थापित करणे असा नित्यक्रम ठरविला होता. गेल्या दोन महिण्यापासून जुबेरने अल्पवयीन असलेल्या मुलीशी बोलणे, भेटणे बंद केले. तेव्हा पीडिता त्याला भेटायला गेली असता तुझा माझा कसलाही संबध नाही व मी लग्न करणार नाही असे त्याने सांगितले.
(वेकोली वसाहतीत राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या, विविध तर्कवितर्कांना उधाण)
लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्यंत कमी वयात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार 17 वर्षीय आदीवासी पीडितेने पोलिसात दिल्यावरून जुबेर अकबर खान, रा. काजीपुरा विरूध्द भांदवि 376/2(छ) 4,16 पोस्को, अनुसुचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, ठाणेदार मुकूंद कुळकर्णी, पीएसआय जयप्रकाश निर्मल व पोलीस करीत आहे.