“कटिंग करून येतो” म्हणत घराबाहेर पडलेले वृद्ध गायब

14 एप्रिलपासून ठावठिकाणा नाही; नागरिकांना मदतीचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सावरकर चौक, जत्रा रोड परिसरात राहणारे पुंडलिक कृष्णाजी शेडामे (वय 82) हे “कटिंग करून येतो” असे सांगून घराबाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले आहेत. ही घटना 14 एप्रिल 2016 रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली असून त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याने कुटुंबीयांसह परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मिळालेल्या माहितीनुसार, शेडामे घरातून निघताना पांढरा शर्ट व पांढरा पायजमा परिधान केलेला होता. तसेच त्यांच्या हातात एक काठी होती. मात्र घराबाहेर पडल्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे व परिसरात शोध घेतला, पण अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सदर व्यक्ती कुठेही आढळल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क: अमोल पुंडलिक शेडामे (मुलगा) मोबाईल: 9604155811 / 9552813584

Comments are closed.