पोलिसांची धाड; अवैध दारू विक्रेता रंगेहात पकडला

वणीतील साधनकरवाडी परिसरात कारवाई; आरोपी अटकेत

विवेक तोटेवार, वणी: शहरातील साधनकरवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीवर वणी पोलिसांनी रात्री उशिरा धाड टाकत एकाला रंगेहात पकडले. ही कारवाई 18 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 9:45 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत साधनकरवाडी येथे छापा टाकला. यावेळी वेदांत विष्णू लांजेवार (रा. तेली फैल, वणी, जि. यवतमाळ) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीकडून प्रत्येकी 90 एमएलच्या 40 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1,600 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अचूक नियोजन करून पार पाडली.

 

Comments are closed.