नवीन वागदरा येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. शनिवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास ती बेपत्ता झाल्याचे तिच्या कुटुंबीयांना लक्षात आले. याबाबत मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्यांनी मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Podar School 2025

फिर्यादी हे नवीन वागदरा येथे आपल्या तीन मुलीसह राहतात. त्यांची मोठी मुलगी ही नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्या तिन्ही मुली घरी  झोपल्या होत्या. पहाटे 4 वाजताच्या सुमारास मुलीच्या आईला यातील मोठी मुलगी आढळून आली नाही. त्यांनी ही बाब मुलीच्या वडिलांस सांगितली. मुलीच्या वडिलांनी सकाळी शेजारी व नातेवाईकांना विचारपूस केली. परंतु मुलगी आढळून आली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अखेर मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच  त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठले व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भांदविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास एपीआय संदीप एकाडे करीत आहे. मुलीच्या पालकांनी मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हे देखील वाचलंत का?

Leave A Reply

Your email address will not be published.