मनसेची घे भरारी .. तालुक्यात पक्षप्रवेश व शाखा स्थापनाचा धडाका

जितेंद्र कोठारी, वणी : येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका समोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामीण भागात पक्षप्रवेश व मनसे शाखा स्थापन करण्याचा धडाका लावला आहे. मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन असंख्य तरुण मनसे कडे आकर्षित होताना दिसत आहे. 

वणी तालुक्यातील कुर्ली व येनाडी गावात शुक्रवार 2 जून रोजी मनसे नेता राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत गावातील शेकडो स्त्री, पुरुष व युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये विधिवत प्रवेश केले. यावेळी दोन्ही गावात मनसेची शाखा स्थापन करून राजू उंबरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वणी तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चांगला वर्चस्व आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत मनसेने आपली ताकद सिद्ध करुन दाखवली आहे. तालुक्यात मनसेचा वाढत प्रभाव प्रस्थापितांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

कुर्ली व येनाडी येथे शाखा उद्घाटनाच्या वेळी राजू उंबरकरसह मनसेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, तालुका उपाध्यक्ष धीरज पिदुरकर, विलन बोदाडकर, गितेश वैद्य, विभागीय अध्यक्ष महेश कुचनकर , रणजित बोंडे, उपविभागीय अध्यक्ष भरत चटप , उपविभागीय अध्यक्ष मारोती बोटपेले, गजानन ठाकरे, राजु काळे, अनंता डाखरे , विनोद कुचनकर, मोरेश्वर ननकटे , साई उघे, संतोष बुच्चे, गजानन उघे, प्रविण मोहजे व गावकरी उपस्थित होते.

Comments are closed.