वणीकरांनी अनुभवला विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडी थरार

विवेक तोटेवार, वणी: मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वणी शहरात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. सोमवार 11 सप्टेंबर रोजी शासकीय मैदान, वणी येथे याठिकाणी दहीहंडीचा थरार अनुभवयास मिळाला. या कार्यक्रमाला आलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थितांची मनं जिंकली. दरम्यान वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी मनसे रोजगार मेळावा 2022 ची घोषणा करण्यात आली.

सोमवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी गोपाळकालानिमित्त सोमवारी वणी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केले. यानिमित्ताने प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थिती दर्शविली. 

या दहीहंडीसाठी प्रथम बक्षीस २ लाख ५० हजार रुपये, द्वितीय बक्षीस १ लाख रुपये, तृतीय बक्षीस ५० लाख रुपये जाहीर करण्यात आले होते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर आणि महाराष्ट्रातील नामांकीत गोविंदा पथकांनी या दहीहंडीत भाग घेतला होता. विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विविध जिल्ह्यातील विजेत्या गोविंदा पथकांना बक्षीस मानधन सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या शुभहस्ते आणि मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आले. प्रथम क्रमांक मुंबई येथील गोविंदा पथकाने पटकाविला. 

16 सप्टेंबर पासून रोजगार मेळावा
वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी 16 सप्टेंबर पासून मनसे रोजगार मेळावा 2023 ची पक्षनेते राजू उंबरकर यांनी घोषणा केली. ही दिवाळी वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी खास असणार आहे. 5 हजार पेक्षा अधिक युवकांना नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेसह, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित सर्वांचे राजू उंबरकर यांनी आभार मानले.

Comments are closed.