राजू उंबरकर यांच्या हस्ते मराठी भाषा संवर्धन संस्थेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त पत्रकारांचा केला सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी:  27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्था ढाणकी ता. उमरखेड या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ www.mlcmo.org चे लोकार्पण मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याहस्ते करण्यात आले. लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात वणी येथील पत्रकारांचे शाल, श्रीफळ, व कवी कुसुमाग्रज स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून 27 फेब्रुवारी त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

मनसे कार्यालयात आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ मार्गदर्शक गोविंद थेरे, मनसे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मनसे वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, मनसे रुग्णसेवेचे अज्जू शेख, मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पेंढरवाड, कार्याध्यक्ष नागोराव कोम्पलवार, उपाध्यक्ष लक्ष्मण काकरवार, कोषाध्यक्ष निशांत कपाट उपस्थित होते. यावेळी मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुरेश पेंढरवाड यांनी  शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून राजु उंबरकर यांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितिन मोवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसे कार्यकर्ता गितेश वैद्य, राजू बोधाडकर, अरविंद राजुरकार, नितिन पारखी, धोटे, अनिकेत येसेकर यांनी परिश्रम घेतले.

 

Comments are closed.