शिंदोला येथील क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सत्तर संघांनी घेतला सहभाग; सैदाबादचा संघ ठरला अव्वल

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील नवयुवक क्रिकेट क्लब द्वारा घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि. 26 फेब्रुवारी शनिवारला पार पडला. स्पर्धेत 70 संघांनी सहभाग घेतला. परिसरातील खेळाडू आणि प्रेक्षकांचा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचे पहिले पारितोषिक उन्नती एलेव्हन क्रिकेट क्लब, सैदाबाद, दुसरे नवयुवक क्लब, शिंदोला, तिसरे एमबीसीसी, कळमना, चवथे समता क्लब, घुग्गूस तर पाचवे पारितोषिक फायर बी, शिंदोला यांनी पटकावले. तर वैयक्तिक बक्षिसात उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुरेंद्र कोरकंटी, घुग्गूस, उत्कृष्ट गोलंदाज अमोल काकडे, कळमना, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुणाल बोबडे, चिंचोली, उत्कृष्ट यष्टीरक्षक सूरज मडावी, सैदाबाद तर उत्कृष्ट झेलपटू तुषार काळे, शिंदोला यांनी बाजी मारली. 

बक्षीस वितरण सरपंच विठ्ठल बोंडे, पो.पाटील लक्ष्मण बोबडे, पंचायत समिती सदस्य संजय निखाडे, उपसरपंच किशोर किनाके, शांतीलाल जैन, लुकेश्वर बोबडे, लक्ष्मण दानव, सुरेंद्र उरकुडे, निळकंठ चटप, राजू गारघाटे, सुभाष भोंगळे, जीवन डवरे, मुरलीधर ठाकरे, अमोल हेपट यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रामदास कोल्हे, भानुदास काकडे, रविन्द्र बोबडे, राजु इद्दे, नितीन आवारी, हसनोद्दिन सय्यद, हरेंद्र सिडाम आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अध्यक्ष आशिष बोबडे, उपाध्यक्ष अमोल ढवस, सचिव फिरोज सय्यद, तुषार काळे, मारोती परागे, राजेश टोंगे, श्रीकांत ठाकरे, चंदन काळे,चेतन दानव, सुमित पिंपळकर, सुधीर थेरे, कुणाल बोंडे, मंगेश वाभीटकर, आशिष चटप, गणेश दुर्वे, प्रफुल चेडे, प्रज्योत दुर्गे, शैलेन्द्र डहाकी आदींनी परिश्रम घेतले.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!